पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुरक्षा महत्त्वाची, एअर इंडियानं इराणमधील विमान प्रवासाचे मार्ग बदलले

( छाया सौजन्य : रॉयटर्स)

एअर इंडियानं बुधवारी इराणमधून युरोपात जाणाऱ्या सर्व विमानाचे मार्ग बदलले आहेत. इराणमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशातच बुधवारी सुलेमानीच्या हल्ल्याचा सूड घेत इराणनं इराकमधील अमेरिकन तळावर मिसाईल हल्ले केले.

ही युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता एअर इंडियानं विमान प्रवासाच्या मार्गात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ''प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आम्हाला सर्वांत महत्त्वाची आहे. सध्या इराणमधली परिस्थीती पाहता एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची जी विमानं इराणच्या हद्दीतून उडत होती त्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत'', अशी माहिती एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी दिली आहे. 

इराकमधील भारतीयांसाठी आणि हवाई प्रवासासाठी केंद्राचा महत्त्वाचा सल्ला

 मार्गात बदल केल्यामुळे प्रवासाचा कालावधी काही मिनिटांनी लांबण्याची शक्यता आहे. दिल्लीतून प्रवास २० मिनिटांनी तर मुंबईतून जाणाऱ्या विमानांचा प्रवास हा ३० ते ४० मिनिटे लांबण्याची शक्यता आहे. मेलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया एअर लाइन्सनेदेखील सध्याची परिस्थिती पहता मार्गात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

अमेरिकेकडून ड्रोनच्या साह्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचा वरिष्ठ कमांडर कासिम सुलेमानी मारला गेला होता. त्यानंतर या दोन्ही देशांमधील तणावाची स्थिती वाढली आहे. सुलेमानीच्या हत्येचा बदला घेत इराकमधील अमेरिकेच्या ताब्यातील तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र डागण्यात आली.

इराणमध्ये युक्रेनचे प्रवासी विमान कोसळले, १७६ मृत्युमुखी