पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रपतींच्या विमानाला ३ तास उशीर झाल्यावर सविस्तर चौकशीचे आदेश

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

परदेश दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या एअर इंडिया वन विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांच्या नियोजित दौऱ्याला तीन तास उशीर झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश एअर इंडिया व्यवस्थापनाने दिले आहेत. झुरिक विमानतळावर हा प्रकार घडला. राष्ट्रपती ९ सप्टेंबरपासून आईसलँड, स्वित्झर्लंड, स्लोव्हानियाच्या दौऱ्यावर आहेत.

'नाणारचं' जे झालं तेच 'आरेचं' होईल, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

बोईंग ७४७ विमानातून रविवारी रामनाथ कोविंद हे झुरिक विमानतळावरून स्लोव्हेनियाला जाणार होते. पण त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सुमारे तीन तासांचा उशीर झाला. रामनाथ कोविंद विमानतळावर पोहोचल्यावर त्यांना परत हॉटेलकडे पाठविण्यात आले होते. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

आधार कार्डवरील ही माहिती अपडेट करण्यासाठी कागदपत्रांची गरज नाही

या तांत्रिक बिघाडानंतर एअर इंडियाने लंडन विमानतळावर बोईंग ७७७ विमान तयार ठेवले होते. जर राष्ट्रपतींना घेऊन जाणाऱ्या विमानातील बिघाड दूर झाला नसता, तर हे विमान झुरिकला पाठविण्यात येणार होते. पण झुरिक विमानतळावरील एअर इंडियाच्या वैमानिकांनी तांत्रिक दोष दूर केल्यानंतर त्यांचे एअर इंडिया वन विमान त्यांना घेऊन स्लोव्हेनियाला रवाना झाले.