पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टॅक्सीबॉटचा वापर करणारी एअर इंडिया पहिली कंपनी, काय आहे ही सेवा

टॅक्सीबॉट

एअरबस ३२० बनावटीच्या विमानांसाठी टॅक्सीबॉट वापरणारी एअर इंडिया ही जगातील पहिली विमान वाहतूक क्षेत्रातील कंपनी ठरली आहे. व्यावसायिक पद्धतीच्या विमानासाठी टॅक्सीबॉट वापरण्याचा शुभारंभ नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी करण्यात आला.

उरलेले आयुष्य कोकणाच्या विकासासाठी घालवणार: नारायण राणे

टॅक्सीबॉटचा वापर करून मंगळवारी सकाळी मुंबईकडे निघालेले एअर इंडियाचे विमान टर्मिनल ३ वरून धावपट्टीच्या दिशेने नेण्यात आले. विमानामध्ये प्रवासी असताना अशा पद्धतीने पहिल्यांदाच टॅक्सीबॉटचा वापर करण्यात आला. एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यावेळी उपस्थित होते.

जगभरात पहिल्यांदाच एअर इंडियाने अशा पद्धतीने टॅक्सीबॉटचा वापर केला आहे. आमच्या सर्वांना अभिमान वाटेल, अशीच ही घटना आहे. स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने आम्ही टाकलेले हे एक पाऊल आहे, असे अश्वनी लोहानी यांनी सांगितले.

मी कसा काय विरोध करू शकतो? - शरद पवार

टॅक्सीबॉट नक्की आहे काय?
टॅक्सीबॉट ही वैमानिकाकडून नियंत्रित केली जाणारी विमान वहन व्यवस्था आहे. या माध्यमातून टर्मिनलमधील विमान धावपट्टीपर्यंत घेऊन जाणे किंवा धावपट्टीवर उतरलेले विमान टर्मिनलपर्यंत घेऊन येणे हे दोन्ही शक्य होणार आहे. विमानाचे इंजिन बंद ठेवूनही ते धावपट्टीपर्यंत नेता येणे हे टॅक्सीबॉटमुळे शक्य होते. त्यामुळे इंधनामध्ये बचत होते. यामुळे बोर्डिंग गेट्सवरील गर्दी कमी करणेही शक्य होणार आहे. सेमी रोबोटिक पद्धतीने हे टॅक्सीबॉट काम करतात.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Air India is worlds first airline to use TaxiBot on A320 aircraft with passengers onboard