पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधी उधारी चुकवा, मगच तिकीट मिळेल; सरकारी संस्थांना Air Indiaचा दणका

एअर इंडिया

एअर इंडियाने विविध सरकारी संस्थांना उधारीवर तिकीट देण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत थकबाकी दिली जाणार नाही. तोपर्यंत कंपनी क्रेडिट बेसवर सरकारी संस्थाना तिकीट देणार नाही, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

तुकडे-तुकडे गँगला जनेतेने धडा शिकवावाः अमित शहा

विविध सरकारी संस्थांकडे एअर इंडियाचे सुमारे २६८ कोटी रुपये थकबाकी आहे. दरम्यान, यापूर्वी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप सिंह पुरी यांनी मागील महिन्यात संसदेत म्हटले होते की, एअर इंडियाचे खासगीकरण न झाल्यास ती बंद करावी लागेल. यासाठी एक अनुकूल सौदा निश्चितपणे केला जाईल, असा दिलासाही त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिला होता.

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनावर लष्करप्रमुखांची टीका

सरकार एअर इंडियातील आपली हिस्सेदारी विकण्यासाठी दस्तावेज तयार करत आहे. निर्गगुंतवणूकीची मुदत ३१ मार्च निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या प्रयत्नात मोदी सरकारने मे २०१८ मध्ये आपली ७६ टक्के हिस्सेदारी विकण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट (ईओआय) आमंत्रित केले होते. परंतु, बोलीच्या पहिल्या टप्प्यात एकाही खासगी कंपनीने रुची दाखवली नाही.

धक्कादायक: ग्रहणकाळात तीन विशेष मुलांना जमिनीत पुरले