पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एअर इंडियाच्या कार्याला पाकिस्तानने केला सलाम

एअर इंडियाचे खासगीकरण

कोरोना विषाणूच्या या दहशतीच्या वातावरणातही भारत सातत्याने दुसऱ्या देशातील नागरिकांची मदत करत आहे. भारतात फसलेल्या यूरोपीय नागरिकांसाठी देवदूत बनलेल्या एअर इंडियाच्या कार्याला पाकिस्ताननेही सलाम केला आहे. ज्यावेळी एअर इंडियाचे एक विमान यूरोपीय नागरिक आणि मदत साहित्य घेऊन भारतातून फ्रँकफर्टला जात होते. त्यावेळी पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने (एटीसी) कौतुक केले. 

धारावीत आतापर्यंत कोरोनाचे ५ रुग्ण, अडीच हजार लोक होम क्वारंटाइन

'अस्सलाम अलैकुम' कराची एटीसी तुमचे स्वागत करत आहे
एअर इंडियाच्या या विशेष विमानाच्या एका वरिष्ठ कॅप्टनने 'एएनआय'ला सांगितले की, माझ्यासह संपूर्ण एअर इंडियाच्या चालक दलासाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण होता. पाकिस्तानच्या एटीसीने फ्रँकफर्टच्या आमच्या विशेष विमानाचे कौतुक केले. ज्यावेळी आम्ही पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात आणि पाकिस्तानच्या एटीसीत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी आमचे स्वागत केले. 'अस्सलाम अलैकुम', कराची एटीसी फ्रँकफर्टला जात असलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाचे आम्ही स्वागत करतो. 

लॉकडाऊन काळातही भाजप आमदाराकडून विठ्ठल-रक्मिणीची महापूजा

पाकिस्तान एटीसीने पुढे म्हटले की, तुम्ही फ्रँकफर्टला विशेष मदतीचे विमान घेऊन जात आहात का, याची पुष्टी करा. त्यानंतर भारतीय वैमानिकाने याला पुष्टी देऊन आभार मानले. त्यानंतर एअर इंडियाच्या विमानाला पुढे जाण्याचे निर्देश देण्यात आले. पुढे पाक एटीसीने म्हटले की, आम्हाला तुमच्यावर गर्व आहे, या महामारीच्या स्थितीतही तुम्ही उड्डाण करत आहात, गुड लक. त्यानतर भारतीय वैमानिकानेही तुमचे खूप आभार आहे, असे म्हटले. 

मलेशियाला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 'तबलिगी'च्या ८ जणांना अटक

त्याचबरोबर जेव्हा या विशेष विमानाची धुरा सांभाळणाऱ्या एअर इंडियाच्या कॅप्टनने पाकिस्तान एटीसीला इराणच्या हवाई क्षेत्रासाठी पुढील रडार मिळत नसल्याचे म्हटले. त्यावर पाकिस्तानने तेहराण हवाई क्षेत्राला भारतीय विमानाची स्थिती सांगितली आणि एअर इंडियाच्या दोन विशेष विमानांना याची माहिती दिली. दरम्यान, एअर इंडियाचे बोईंग-७७७ आणि बोईंग ७८७ च्या चालक दलाच्या अनेक सदस्यांना मुंबई आणि दिल्लीतून यूरोपीय आणि कॅनडियन नागरिकांसाठी विशेष उड्डाणांसाठी तैनात करण्यात आले होते. 

एअर एशिया १५ एप्रिलपासूनचे तिकीट बुकिंग सुरु करणार

इराणनेही एअर इंडियाला थेट प्रवेश दिला. इराणने असे पहिल्यांदाच केले असावे. कारण, इराणच्या हवाई क्षेत्राचा थेट मार्ग केवळ त्यांच्या संरक्षण उद्देशांसाठीच आरक्षित करण्यात आलेले आहे. इराणनेही 'ऑल द बेस्ट' असे म्हणत शुभेच्छा दिल्याचे भारतीय कॅप्टनने सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Air India found praise from an Air Traffic Controller of Pakistan amid Fight Against Coronavirus