पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वीज चमकल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला धक्का, कर्मचारी जखमी

वीज चमकल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला धक्का, कर्मचारी जखमी (Photo: ANI)

जमिनीपासून हजारो फूट दिल्लीवरुन विजयवाडाकडे जात असलेल्या विमानाला आकाशात वीज चमकल्यानंतर मोठा धक्का बसला. विमानातील क्रू सदस्य हे प्रवाशांना खाद्य पदार्थ देत होते, त्याचवेळी हा धक्का बसला. या धक्क्यामुळे विमान हादरले. क्रू सदस्य जखमीही झाले आणि विमानाचेही नुकसान झाले आहे.

प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही. पण क्रू सदस्य हे त्यावेळी खाद्य पदार्थ देण्यासाठी उभे असल्यामुळे ते खाली पडले आणि जखमी झाले. खाद्य पदार्थही खाली पडले. 

लिव-इनपेक्षा विवाहित महिला अधिक आनंदीः RSS

विमानातील लॅविटरी कमोडचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. विमान क्रमांक ४६७ ला आकाशातील वादळाचा तडाखा बसला. विमान कंपनीने चौकशीचे आदेश दिले आहेत.