पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... या देशातील एअर इंडियाची विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत रद्द

एअर इंडियाचे खासगीकरण

जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्यामुळे एअर इंडियाने इटली, फ्रान्स, दक्षिण कोरिया, कुवेत, माद्रिद आणि कोलंबो या देशांना जाणारी आणि येणारी विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत रद्द केली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे कर्नाटकमधील एका वयोवृद्ध व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. भारतातील हा कोरोना व्हायरसचा पहिला बळी आहे. आतापर्यंत ७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

IPLची सुरुवात १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली, बीसीसीआयचा निर्णय

कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या महाराष्ट्रातही वाढते आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रात १४ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यापैकी ९ जण हे पुण्यातील आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक कार्यक्रम तूर्त रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

'ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प एकांगी आणि जनतेची दिशाभूल करणारा'

दिल्लीमध्ये ३१ मार्चपर्यंत सर्व चित्रपटगृहे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये सर्व शाळांनाही या कालावधीत सुटी जाहीर करण्यात आली आहे. केवळ दिल्लीतील परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Air India cancels all its flights to Italy France South Korea Kuwait Madrid and Colombo till April 30