राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एअर इंडियाने वेगळ्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एअर इंडियाच्या ताफ्यातील एअरबस ३२० विमानावर महात्मा गांधी यांचे रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे.
'काही लोकं आरएसएसला देशाचे प्रतीक बनवू इच्छित आहेत'
विमानाच्या मागील बाजूस ११ बाय ४.९ फुटाचे महात्मा गांधींचे रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या हँगरमध्ये चित्रकाराने हे चित्र रेखाटले. आता हे विमान मुंबई ते दिल्ली या दोन्ही महानगरांतील प्रवासासाठी वापरण्यात येणार आहे.
काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचे पितळ उघडे, पाककडून मिळते आर्थिक मदत
एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार म्हणाले, एअर इंडियाच्या ताफ्यातील एका विमानावर कायमस्वरुपी महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटून आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. वेगळ्या पद्धतीने महात्मा गांधींना आम्ही श्रद्धांजली वाहिली आहे. सर्व प्रकारच्या मान्यता घेतल्यानंतर आमच्याकडील एका चित्रकाराने हे चित्र रेखाटल्याचे त्यांनी सांगितले.