पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राफेल ताफ्यात दाखल होताच पाकवर भारी ठरू - हवाई दलप्रमुख

भारतीय हवाईदल प्रमुख बी एस धनोआ

भारतीय हवाईदल प्रमुख बी एस धनोआ यांनी सोमवारी पंजाबमधील भटिंडाजवळ 'मिसिंग मॅन' फॉर्मेशनमध्ये उड्डाण करुन २० वर्षांपूर्वी कारगिल युद्धात शहीद झालेले स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा यांना श्रद्धांजली वाहिली. आहुजा यांना त्यांच्या साहसाबद्दल मरणोपरांत वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

हवाईदल प्रमुख धनोआ म्हणाले की, वर्ष २००२ मध्ये ऑपरेशन पराक्रमदरम्यान त्यांची (पाकिस्तान) क्षमता नव्हती. त्यानंतर त्यांनी आपले तंत्रज्ञान अपग्रेड केले होते. पण राफेल आपल्या ताफ्यात दाखल होताच आपली बाजू भक्कम होईल. 

भटिंडा बाहेर असलेल्या भिसियाना एअर बेसवरुन उड्डाण करुन 'मिसिंग मॅन' आकृती बनवण्यात आली. यामध्ये एअर मार्शल आर नंबियार यांनीही भाग घेतला.

कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानने भारतीय वायू सेनेचे स्क्वाड्रन लीडर आहूजा यांचे विमान पाडले होते. पॅराशूटच्या सहायाने उतरलेल्या आहूजा यांची पाकिस्तानच्या सैनिकांनी निर्घूणपणे हत्या केली होती.