पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बालाकोट हल्ल्यावेळी भारतीय हवाई दलाने क्षमता सिद्ध केली'

भारतीय हवाई दल प्रमुख

भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी मंगळवारी बालाकोट येथील सर्जिकल स्ट्राईकचा दाखला देत हवाई दलाच्या मारक क्षमता सक्षम असल्याचे सांगितले.  

बालाकोट एअर स्ट्राइकच्या ५ महिन्यानंतर पाकने हवाई क्षेत्र केले खुले

'ऑपरेशन सफेद सागर' (कारगिल युद्धावेळी भारतीय हवाई दलाकडून देण्यात आलेला कोड) या घटनेला २० वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एअर चीफ मार्शल धनोआ म्हणाले की, बालाकोट हल्ल्यात भारतीय हवाई दलाने ऑपरेशन अचूक आणि यशस्वीपार पाडण्याची क्षमता दाखवून दिली. गेल्या काही वर्षांत हवाई दलाची क्षमता अधिक वाढली असून हा मोठा बदल आहे, असेही ते म्हणाले. 

चांद्रयान २ : तांत्रिक दोष वेळीच लक्षात आला म्हणून बरे झाले, नाहीतर...

पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील दहशतवादी तळे नष्ट केली होती. या हल्ल्यात भारतीय हवाई दलातील मिराज-२००० या विमानाचा वापर करण्यात आला होता.