पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमचे १५ कोटी, १०० कोटींवर भारी; वारिस पठाणांचे वादग्रस्त वक्तव्य

वारिस पठाण

'आम्ही फक्त १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत', असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केले आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथे सीएएविरोधातील एका सभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 'स्वातंत्र्य मिळत नसेल तर हिसकावून घ्यावे लागेल आणि ती वेळ आली आहे.', असे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

दलितांवर अत्याचार केल्याचा राजस्थानातील व्हिडिओ भीषण - राहुल गांधी

वारिस पठाण यांनी पुढे असे म्हटले आहे की, 'आम्ही वीटचे उत्तर दगडाने द्यायला शिकलो आहोत. आता आपल्याला एकत्र चालावे लागणार आहे. स्वातंत्र्य द्यावे लागेल पण मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्यावे लागेल. ते म्हणतात की आम्ही बायकांना पुढे केलंय. पण आता फक्त वाघिणीच बाहेर आल्या आहेत तर तुम्हाला घाम फुटतोय. पण आम्ही सर्वजण एकत्रित आलो तर काय होईल हे समजून घ्या.' तसंच, आम्ही १५ कोटी आहोत पण १०० कोटींवर भारी आहेत. हे लक्षात ठेवा.', असे त्यांनी सांगितले. 

कोणता सर्जिकल स्ट्राईक केला?, कमलनाथांचा भाजपला सवाल