पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओवेसींनी संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली

ओवेसींनी संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी विधेयकाची प्रत फाडली. ओवेसींच्या कृतीवर गोंधळ सुरु झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या आसनावर असलेल्या रमादेवी यांनी हे कृत्य सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले. ओवेसी यांनी विधेयकाला तीव्र विरोध करत म्हटले की, आम्ही जिन्ना यांचे ऐकले नाही आणि मौलाना आझाद यांच्या विचारांवर आम्ही ठाम राहिलो. त्यांनी आपला हिंदुस्थानशी १००० वर्षांपासून संबंध असल्याचे म्हटले होते. पण सरकारला मुसलमानांची इतकी समस्या का आहे, असा सवाल त्यांनी केला. 

बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर;चंद्रकांत पाटील म्हणाले,त्या आजारी आहेत

ओवेसींनी विधेयकाची प्रत फाडताना म्हटले की, देशाची आणखी एक फाळणी होणार आहे. हे विधेयक भारताच्या संविधानाच्या मूळ भावनेविरोधात आहे. हे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारे विधेयक आहे. देशाची फाळणी करण्याचा प्रयत्न करत असलेले हे विधेयक मी फाडतो. मी या विधेयकाच्या विरोधात उभा आहे. आपण जेव्हा हे संविधान केले होते. तेव्हापासून आतापर्यंत किती घसरण झाली आहे.

नाराज एकनाथ खडसेंनी दिल्लीत शरद पवारांची घेतली भेट

राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाच्या प्रस्तावनेला भगवान किंवा खुदा या नावाने लिहिण्यास विरोध केला होता, असेही ओवेसी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आम्ही मुसलमान आहोत हाच आमचा गुन्हा आहे का. तुम्ही मुसलमानांना राज्यविहिन करत आहात. आता आणखी एक फाळणी होणार आहे. हे हिटलच्या कायद्यापेक्षाही वाईट विधेयक असल्याचे त्यांनी म्हटले.

कर्नाटक पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव, सिद्धरामय्यांचा राजीनामा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:AIMIM leader Asaduddin Owaisi tore a copy of Citizenship Amendment Bill 2019 in Lok Sabha