पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बैठकीसाठी पंतप्रधानांचे निमंत्रण नाही, ओवेसी भडकले

असदुद्दीन ओवेसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात सर्वांना घेऊन जाण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर ८ एप्रिलला चर्चा करणार आहेत. परंतु, पंतप्रधान मोदींचे निमंत्रण न मिळाल्याने एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी मात्र भडकले आहेत. एमआयएमला बैठकीला न बोलावणे म्हणजे हैदराबाद आणि औरंगाबादच्या लोकांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मुंबईत एकाच दिवशी १०३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर, राज्याचा आकडा ७४८ वर

पीएमओला टि्वट करुन ओवेसी यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. ते म्हणाले की, हा औरंगाबाद आणि हैदराबादच्या लोकांचा अपमान आहे. ही कमजोर लोकं आहेत का, कारण त्यांनी एमआयएमला निवडले? कृपया याबाबत स्पष्ट करा की ते तुम्हाला आकर्षित करण्यास पात्र का नाहीत? खासदार म्हणून तुमच्यासमोर आमच्या लोकांची आर्थिक आणि मानवी समस्या समोर ठेवणे हे आमचे काम आहे. 

आपल्या दुसऱ्या टि्वटमध्ये ओवेसींनी लिहिले की, हैदराबाद आणि औरंगाबादच्या लोकांनी मला आणि इम्तियाज जलील यांना निवडून दिले, कारण आम्ही त्यांचे मुद्दे उपस्थित करावेत. आता आम्हाला या कामापासूनच रोखले जात आहे. हैदराबादमध्ये एकूण ९३ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या विषाणूविरोधात कसे लढता येई आणि कोणत्या क्षेत्रात आपण कमी पडतो याबाबत मी माझे विचार मांडू इच्छितो. 

देशातील २७४ जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, २६७ रुग्ण झाले बरे

दरम्यान, कोरोना विषाणूबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या पक्षाच्या संसदीय प्रतिनिधी आणि नेत्यांशी ८ एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:aimim leader asaduddin owaisi angry on pm modi for not inviting all party meeting for organizing on the background of coronavirus