पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

HT शिखर परिषदः NRC झाल्यास देशातून ८ कोटी मुसलमान बाहेर जातील- ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

जर देशात एनआरसी झाली तर आठ कोटी मुसलमान यातून बाहेर जातील, अशी प्रतिक्रिया एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी हिंदुस्थान शिखर संमेलनात एनआरसीचा विरोध करताना दिली. त्याचबरोबर त्यांनी एनडीएच्या परराष्ट्र नितीवर प्रश्न उपस्थित केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येऊन आपल्याशी धार्मिक स्वातंत्र्यावर बोलणार. जर आपण अमेरिकेला आपला मित्र समजत असू तर ती आपली सर्वांत मोठी चूक असेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

महाराजांचा जय जयकार करायला कमीपणा वाटतो का?: मनसे

अमेरिका मित्र आहे, तर त्यांनी हाफिजला का मारले नाही ?

ओवेसींनी भारत-अमेरिकेच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, जर ते आपल्याला मित्र समजत असतील. तर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला मारण्यासाठी ते मदत का करत नाही?. पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये का टाकले नाही, कारण अमेरिकेने त्यांच्याशी ग्रे लिस्टमध्ये टाकण्याबाबत भाष्य केले आहे. 

भाजपने शाहिन बाग मुद्दा बनवला होता

सीएएवर ओवेसी म्हणाले की, दिल्ली निवडणुकीनंतर शाहिन बाग प्रकरण संपुष्टात येईल, असे समजले जात होते. पण ते संपले का ?. संविधान वाचवण्याची जबाबदारी कुणा एकाची नाही तर ती जनतेचीही आहे. भाजपने शाहिन बागचा मुद्दा बनवला होता पण त्यांना जागा किती मिळाल्य?.

सीएएतून ज्या मुसलमानांचे नाव एनसीआरमध्ये आले नाही. त्यांचा समावेश केला जाईल. धर्माच्या नावावर तुम्ही कायदा केलेला आहे. जम्मू-काश्मीर आणि सीएए या दोन्ही मुद्द्यांचं आंतरराष्ट्रियीकरण करण्यात आले.

NZ vsIND 1st Test Day 2 : दोन दिवसांत एकाच बहाद्दराचं अर्धशतक!

एनपीआर होणार असेल तर एनआरसी निश्चित होणार

जर एनपीआर लागू झाले तर एनआरसीही निश्चित होईल. आसाममध्ये एनआरसी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाला. एनपीआर आणि एनआरसीची आवश्यकता नाही. देशातील अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. आसाममध्ये एनआरसी लागू करणे सोपे होते. परंतु, देशभरात लागू करणे कठीण असेल.

अक्षय्य तृतीयेला सुरु होऊ शकते राम मंदिराचे बांधकाम