पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रमजानच्या नमाजसाठी घराबाहेर पडू नका, ओवेसींचे आवाहन

असदुद्दीन ओवेसी

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. दरम्यान रमजानचा पवित्र महिना सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रमजान दरम्यान देशातील मुसलमानांनी नमाज पठण करण्यासाठी आपल्या घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. 

'देशातील ८० जिल्ह्यात १४ दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही'

ते म्हणाले की, सायंकाळी सात वाजता संचारबदी सुरु होईल. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. मी सर्व लोकांना आवाहन करु इच्छितो की, मशिदीत नमाज पठण करण्यासाठी बाहेर निघू नका. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगही राखा. 

कोरोनाचा परिणामः अमेरिकेत १९३० च्या मंदीनंतरची सर्वाधिक बेरोजगारी

दुसरीकडे यापूर्वी रमजानच्या प्रारंभावरुन मक्का मशिदीचे अधीक्षक मोहम्मद अब्दुल कादिर सिद्दीकी यांनीही सर्वांना घरातच इबादत करण्याची विनंती केली होती. कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या कुटुंबीयांसोबत घरीच इबादत करावी असे त्यांनी म्हटले होते. 

दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम यांनीही कोरोनापासून सुटका करायची असेल तर सरकारच्या सूचनांचे पालन करावे लागेल असे म्हटले होते.

धक्कादायक!, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक