पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video: ओवेसींच्या सभेत तरुणीकडून 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी

ओवेसींच्या सभेत पाक जिंदाबाज अशी नारेबाजी

एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगळुरुमधील सभेतील व्यासपीठावर एका तरुणीने पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला. सीएए-एनआरसीविरोधातील सभेसाठी उभारलेल्या व्यासपीठावर येऊन घोषणाबाजी करणाऱ्या तरुणीचे नाव अमूल्या असल्याचे बोलले जात आहे. या तरुणीचा पक्षाशी काही संबंध नाही, असे ओवेसींनी म्हटले आहे. 

आमचे १५ कोटी, १०० कोटींवर भारी; वारिस पठाणांचे वादग्रस्त

संबंधित तरुणीला सेव्ह कॉन्स्टिट्यूशन नावाच्या एका संस्थेच्यावतीने कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले होते. व्यासपीठावर आल्यावर तिने पाकिस्तान जिंदाबाद अशी नारेबाजी सुरु केली. तिच्या या कृतीनंतर ओवेसींसह व्यासपीठावरील मंडळी तिच्या हातातील माइक घेण्यासाठी धावले. त्यानंतरही तरुणी व्यासपीठावर घोषणाबाजी करतच राहिली. पोलिसांच्या मदतीने तिला व्यासपीठावरुन खाली नेण्यात आले. 

वादग्रस्त वक्तव्यानंतर वारिस पठाण म्हणाले, माफी मागणार नाही!

यासर्व प्रकारावर ओवेसी म्हणाले की, मी या घटनेचा निषेध करतो. संबंधित तरुणीचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही. आमच्यासाठी भारत जिंदाबाद आहे नाही राहिल. आयोजकांनी कार्यक्रमासाठी या तरुणीला बोलवायला नको होते. आमची मोहिम ही भारताच्या संरक्षणाची आहे. आम्ही शत्रू राष्ट्राचे समर्थन कधीच करणार नाही. जनता दल (एस) चे नगरसेवक इमरान पाशा यांनी या तरुणीला विरोधकांनी पाठवले असेल, अशी शंका व्यक्त केली आहे. भाषण करणाऱ्यांमध्ये या तरुणीचा नाव देखील नव्हते. या प्रकरणात पोलिसांनी गांभिर्याने चौकशी करायला हवी, असेही ते म्हणाले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:aimim asaddudin owaisi bangalore caa nrc protest rally latest video and updates know who is amulya