पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : देशातील पहिल्या कोरोनाग्रस्त डॉक्टरची यशस्वी प्रसूती

सध्याच्या परिस्थितीत डॉक्टरांसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. (संग्रहित छायाचित्र)

देशातील पहिल्या कोरोनाग्रस्त महिला डॉक्टरने शुक्रवारी बाळाला जन्म दिला. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दहा डॉक्टरांच्या टीमने महिला डॉक्टरची यशस्वी प्रसूती केली. बाळ आणि आई दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डीके शर्मा यांन दिलेल्या माहितीनुसार,  शुक्रवारी रात्री सिझेरियनच्या माध्यमातून प्रसूती झाली. प्रसूतीवेळी डॉक्टरांनी प्रॉटोकॉलचे पालन केले. पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) परिधान करुन डॉ. नीरजा बाटला यांच्या नेतृत्वाखील दहा डॉक्टरांच्या टीमने यशस्वी प्रसूती केली.

ताप, खोकला असल्यास सामान्य रुग्णालयात जाऊ नका - मुख्यमंत्री

महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर तिच्या प्रसूतीसाठी खास तयारी करण्यात आली होती. महिला डॉक्टरने शुक्रवारी मुलाला जन्म दिला. डॉ. नीरजा बाटला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, बाळ आईसोबतच असून दोघांनाही विलगीकरण कक्षातच ठेवण्यात आले आहे.स्तनपानामुळे बाळाला कोरोना संक्रमणाचा धोका संभवण्याबाबत कोणताही दावा आतापर्यंत करण्यात आलेला नाही. त्यामुळे बाळाच्या स्तनपानावर कोणतीही बंधने घातली नसून महिला डॉक्टर आपल्या बाळाला स्तनपान करवत असल्याचेही नीरजा बाटला यांनी सांगितले.  

कोविड-१९ : PM मोदींच्या संदेशावर भारतीय लष्कराकडून प्रतिक्रिया

सध्याच्या घडीला कोरोना बाधित रुग्णाच्या प्रसूतीसंदर्भात कोणतीही विशष उपचारपद्धती उपलब्ध नसल्याचे चीनमधील वुहानमध्ये कोविड-१९ संक्रमण झालेल्या गर्भवती महिलांसंदर्भातील एका अभ्यासातून समोर आले होते. या परिस्थितीत समोर यणाऱ्या घटनांच्या आधारेच प्रसूतीसंदर्भातील निर्णय घ्यावे लागतील, असा उल्लेखही प्रबंधामध्ये करण्यात आला होता.