पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील काही भागात कोरोना तिसऱ्या टप्प्यातः एम्स संचालक

देशातील काही भागात कोरोना तिसऱ्या टप्प्यात असल्याचे एम्सच्या संचालकांनी सांगितले. (संग्रहित छायाचित्

देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४००० च्या वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वांधिक प्रकरणे ही महाराष्ट्रातून समोर आली आहेत. महाराष्ट्रातील कोविड-१९ रुग्णांची संख्या ७०० पर्यंत पोहोचली आहे. देश कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. पण  देशातील काही भागात कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याचे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी 'आज तक' या वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले. जर आत्ताच यावर नियंत्रण मिळवले तर हा विषाणू दुसऱ्या टप्प्यापर्यंतच थांबेल, असेही त्यांनी सांगितले. 

कोरोना संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे, अजित पवारांचे आवाहन

डॉ. गुलेरिया म्हणाले की, जगाच्या तुलनेत आपली स्थिती ठीक आहे. जगातील जितकीही प्रकरणे समोर आली आहेत. त्यांच्या तुलनेत आपल्याकडे कमी आहेत. आता आपल्याकडेही जास्त चाचण्या होत आहेत. त्यामध्ये पॉझिटिव्ह प्रकरणे कमी येत आहेत. परंतु, चिंतेचा विषय हा आहे की, देशातील अनेक भाग हे हॉटस्पॉट बनले आहेत. तिथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. 

काही भागात कम्युनिटी स्प्रेड होत आहे. ते रोखले पाहिजे. यासाठी आपल्याला लॉकडाऊनचे पालन करावे लागेल. यासाठी प्रत्येकाला घराबाहेर येण्यापासून रोखले पाहिजे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ७८१ वर

कोणत्या परिसरात आहेत हॉटस्पॉट

डॉ. गुलेरिया म्हणाले की, रुग्णांची कुठून सुरुवात झाली हे समजत नाही त्या भागाला कम्युनिटी स्प्रेड झाला असे म्हणता येईल. मुंबईत अशी प्रकरणे समोर आली आहेत. काही इतर राज्यातही अशी प्रकरणे आढळून आली आहेत. काही परिसरात लोकल स्प्रेडचाही संशय आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:AIIMS director Randeep Guleria said Corona reached the third stage in some parts of the country but