पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंसक आंदोलनाप्रकरणी अहमदाबादेत ४९ जण ताब्यात, ५००० जणांवर गुन्हा

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधा आंदोलन. (संग्रहित छायाचित्र)

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवारी अहमदाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्याप्रकरणी तेथील पोलिसांनी ४९ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये काँग्रेसच्या एका नगरसेवकाचाही समावेश आहे. शहजाद खान असे या नगरसेवकाचे नाव आहे, असे एएनआयने म्हटले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. देशात विविध ठिकाणी गुरुवारी या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. पण अहमदाबाद, लखनऊ, मंगळुरू येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. मंगळुरू आणि लखनऊ येथे एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे.

CAA, NRC वरून संयुक्त राष्ट्रसंघाने देशात सार्वमत घ्यावे- ममता बॅनर्जी

अहमदाबादमधील सरदार बाग परिसरात आंदोलनावेळी आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. सुमारे २०० पेक्षा अधिक आंदोलकांचा जमाव या ठिकाणी होता. काही जणांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचे सांगितले. अहमदाबादमध्ये आंदोलन करणाऱ्या पाच हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती काही टीव्ही वाहिन्यांनी दिली आहे. 

... तोपर्यंत NRC, CAA लागू केले जाऊ शकत नाही - प्रशांत किशोर

नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या दोन मुद्द्यांवरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचवेळी अनेक नागरिक रस्त्यावर उतरून नागरिकत्व कायद्याचा विरोध करीत आहेत. गुरुवारी दिल्ली, मुंबईसह देशाच्या अनेक शहरांमध्ये या कायद्याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ahmedabad Police has detained 49 people in connection with violence during protests against Citizenship Amendment Act