पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रम्प यांना झोपड्या दिसू नयेत म्हणून भिंत बांधण्याची लगबग

गुजरातः ट्रम्प यांना झोपड्या दिसू नयेत म्हणूज रस्त्याच्या कडेला भिंत उभारणी सुरु (ANI)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मिलानिया ट्रम्प २४-२५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. पाहुण्यांच्या स्वागतासाठी गुजरातमधील अहमदाबाद शहर सजवण्यात येत आहे. शहराला स्वच्छ व सुंदर दाखवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. अहमदाबादमधील झोपड्या दिसू नयेत म्हणून भिंती उभारल्या जात आहेत.

नेहरु-पटेल कॅबिनेटवरुन परराष्ट्र मंत्री जयशंकर-रामचंद्र गुहा आमनेसामने

डोनाल्ड ट्रम्प आणि विदेशी पाहुण्यांना रस्त्याच्या बाजूच्या झोपड्या दिसू नये यासाठी अहमदाबाद महानगरपालिका झोपड्यांसमोर भिंती उभारत आहेत. 'एएनआय'ने झोपड्यांसमोर सुरु असलेल्या बांधकामांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाला इंदिरा ब्रिजशी जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला अनेक झोपड्या आहेत. त्या लपवण्यासाठी ही भिंत उभारली जात आहे. 

विशेष म्हणजे, भिंत उभारण्यात येत असल्याचे महापौरांनाच माहीत नाही. मी भिंत पाहिलेली नाही. मला याबाबत काहीच माहीत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

अंधेरी एमआयडीसीतील इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या रस्त्याने डोनाल्ड ट्रम्प येणार आहेत. त्या संपूर्ण रस्त्यावर ५० कोटी रुपये खर्च केले जात आहे. संपूर्ण रस्त्यावर डेकोरेटिव्ह लाईट्स लावण्याचा खर्च एक कोटींच्या आसपास असेल असे बोलले जात आहे. पण यावरुन अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येते. 

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअममध्ये अमेरिकामध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी'सारख्या मोठ्या कार्यक्रमाची तयारी केली जात आहे. कार्यक्रमासाठी ३००० कार आणि १०००० दुचाकी पार्किंगची क्षमता आहे. येथे पॉवर जनरेटरही लावण्यात आले आहे.

मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाचे इंग्लंडहून भारतात प्रत्यार्पण

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ahmedabad municipal corporation is building a wall in front of slum before donald trump visit in india