पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जमावबंदीचे आदेश

सर्वोच्च न्यायालय

रामजन्मभूमी - बाबरी मशिद विवादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात आली असतानाच जिल्हा प्रशासनाने अयोध्येमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार अयोध्येमध्ये चारपेक्षा अधिक लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दिवाळीचा काळ आणि अयोध्ये प्रकरणी येणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. १७ नोव्हेंबरला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.

निवडणूक प्रचाराचा धडाका सुरु; 'या' ठिकाणी होणार दिग्गजांच्या सभा

अयोध्येतील जिल्हाधिकारी अनुजकुमार झा म्हणाले, दिवाळी आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये कलम १४४ नुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. येत्या १० डिसेंबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. अयोध्येमध्ये बेकायदा कृत्येविरोधी कायद्यातील तरतुदींनुसार ३१ ऑगस्ट रोजीच प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. फक्त आता १२ ऑक्टोबरला जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदी_परत_जा अन् राहुल लय भारी! ट्रेंडिंगमध्ये

अयोध्येमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. बाबरी मशिद ६ डिसेंबरला पाडण्यात आली होती. त्या निमित्तही हे आदेश लागू करण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.