पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत दौऱ्यापूर्वी चीनची काश्मीरप्रकरणी भूमिका बदलली

भारतीय जवान

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यापूर्वी चीनने काश्मीर प्रकरणी महत्वाचे वक्तव्य केले आहे. काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळणाऱ्या चीनचे सूर आता बदलल्याचे दिसत आहे. काश्मीर मुद्दा द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला पाहिजे, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने मंगळवारी माध्यमांशी चर्चा करताना म्हटले आहे. या प्रवक्त्याने यावेळी संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचा कोणताच उल्लेख केला नाही. विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे काश्मीरप्रकरणी दुष्प्रचार करण्यासाठी मंगळवारी चीनला पोहोचले आहेत. त्याचवेळी काश्मीरप्रकरणी चीनचे हे वक्तव्य समोर आले आहे. या दौऱ्यात इम्रान हे काश्मीर शिवाय चीन-पाकिस्तान आर्थिक संबंधांवरही चर्चा करणार आहेत.

...तर पवाराची औलाद सांगणार नाही: अजित पवार

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा भारत दौरा आणि त्या आधी इम्रान खान यांच्या चीन दौऱ्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. इम्रान खान यांच्या चिनी नेत्यांबरोबरील चर्चेत काश्मीरचा मुद्दा समाविष्ट असेल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता त्यांना काश्मीर मुद्दा हा दोन्ही देशांनी एकत्रित येऊन सोडवला पाहिजे, असे ते म्हणाले.

ऐतिहासिक दिवस, पहिले राफेल विमान भारतीय हवाई दलाकडे

गेंग म्हणाले, तुम्ही काश्मीर मुद्द्यावर लक्ष देत आहात. बरोबर ? काश्मीर मुद्द्याप्रश्नी चीनची भूमिका स्पष्ट असून आम्ही त्यावर ठाम आहोत. आम्ही भारत आणि पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यासह सर्वंच विषयांवर चर्चेतून एकमेकांतील विश्वास वाढवण्याचे आवाहन करतो. हे या दोन देशांसह जगासाठीही हिताचे आहे.

'शरद पवारांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार'

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे हे वक्तव्य काश्मीरप्रश्नी चीनच्या जुन्या भूमिकेपासून वेगळे आहे. कलम ३७० हटवल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून ६ ऑगस्टला २ निवेदने जारी करण्यात आले होते. चीनने लडाखला वेगळे करुन केंद्रशासित प्रदेश करण्याच्या भारताच्या निर्णयाचा विरोध केला होता. चीन लडाखवर आपला दावा करतो. तर दुसऱ्या वक्तव्यात चीनने भारत आणि पाकिस्तानला काश्मीर वाद चर्चेच्या माध्यमातून शांततेतून सोडवण्याचे आवाहन केले होते.

पीबल्स, मेयर आणि क्वेलोज यांना यंदाचा भौतिक शास्त्राचा नोबेल