पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकमधील एका आमदाराचा राजीनामा मागे, आता पुढे काय...

रामालिंगा रेड्डी

विश्वासदर्शक ठरावावर मतदान होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना कर्नाटकमधील आघाडी सरकारसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. बंडखोरी करून राजीनामा दिलेले काँग्रेसचे आमदार रामालिंगा रेड्डी यांनी आपला राजीनामा मागे घेण्याचे जाहीर केले आहे. आपण विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहात उपस्थित राहणार असून, ठरावाच्या बाजूने मतदान करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. आपण काँग्रेससोबत कायम राहणार असून, आमदार म्हणून आपली कामे चालू ठेवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील १९ जिल्ह्यांत आता पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या १३ आणि जेडीएसच्या ३ आमदारांनी बंडखोरी करीत आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. त्यापैकी एक असलेले रामालिंगा रेड्डी यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. पण अद्याप १५ जण आपल्या राजीनाम्यावर कायम आहेत. त्यातच दोन अपक्ष आमदारांनीही सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचे सरकार पेचात सापडले आहे.

विश्वासदर्शक ठरावावेळी काय घडते, यावरच कुमारस्वामी सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. गुरुवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल. बंडखोरी केलेले बहुतेक आमदार बुधवारी रात्रीपर्यंत मुंबईत वास्तव्याला होते. ठरावावेळी आपण सभागृहात उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 

अंत्योदय एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले

बंडखोर आमदार विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहात अनुपस्थित राहू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या आमदारांना आणखी दिलासा मिळाला आहे.