पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोनाल्ड ट्रम्प दौरा : यमुनेच्या पाण्यातील दुर्गंधी घालवण्यासाठी नवा निर्णय

यमुना नदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील पाटबंधारे खात्याकडून बुलंदशहरातील गंगानहारमधून यमुना नदीत ५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. आग्रामध्ये या नदीच्या किनारी भागामध्ये सध्या दुर्गंधी येत आहे. ती घालविण्यासाठी उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

शिवेंद्रराजे भोसलेंची प्रकृती बिघडली, उपचारासाठी मुंबईला रवाना

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात ते दिल्ली आणि अहमदाबादमध्ये जाणार हे निश्चित आहे. पण ते आग्राला भेट देऊ शकतात. तिथे असलेला ताजमहाल पाहण्यासाठी ते तिथे जाऊ शकतात. त्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यमुना नदीत पाणी सोडण्यात आले आहे.

बुलंदशहरातील गंगानहारमधून सोडण्यात आलेले हे पाणी मथुरामध्ये गुरुवारी पोहोचणार आहे. त्यानंतर शुक्रवारी ते आग्रामध्ये पोहोचेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धर्मेंदर सिंग फोगाट यांनी सांगितले. २४ फेब्रुवारीपर्यंत यमुना नदीत ठराविक पाणी राहिल, असे नियोजन करण्यात आले आहे.

मोदी माझे आवडते, पण भारताशी तूर्त व्यापार करार नाही - डोनाल्ड ट्रम्प

या संदर्भात उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहायक अभियंता अरविंद कुमार म्हणाले, यमुना नदीतून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतलेला असण्याची शक्यता आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ahead of Donald Trumps India visit water released into Yamuna to improve its environmental condition