पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत-बांगलादेशमध्ये ७ करारांवर स्वाक्षरी

भारत-बांगलादेशमध्ये ७ करारावर स्वाक्षरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी शनिवारी भेटीनंतर भारत आणि बांगलादेशदरम्यान एकून ७ करारांवर स्वाक्षरी केली. दोन्ही नेत्यांनी बांगलादेशमधून एलपीजी आयातीसह ३ प्रकल्प लाँच केले. तिन्ही प्रकल्पाचे लाँचिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या एक वर्षांत भारत आणि बांगलादेशदरम्यान १२ संयुक्त प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाल्याबद्दल आनंद होत आहे. दोन्ही देशांदरम्यान विमान वाहतूक वाढवली जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही देशांदरम्यान विमान उड्डाणांची संख्या वाढवून प्रत्येक आठवड्याला १२० केली जाणार आहे. 

ऐन निवडणुकीत हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का

बांगलादेशमधून मोठ्याप्रमाणात एलपीजी पुरवठा दोन्ही देशांसाठी फायदेशीर आहे. यामुळे बांगलादेशमध्ये निर्यात, उत्पन्न आणि रोजगारही वाढेल. वाहतुकीचे अंतर १५०० किमी कमी केल्यामुळे आर्थिक लाभही होईल आणि पर्यावरणाचे नुकसानही कमी होईल. 

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना गुरुवारी चार दिवसीय दौऱ्यावर दिल्लीत आले आहेत. बांगलादेश आणि भारतात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर हसीना यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

अमेरिकेच्या व्हिसा नियमात बदल, अनेक भारतीयांना फटका बसणार