पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताने पहिल्यांदाच रात्री केली अग्नि-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, २००० किमी क्षमता

संग्रहित छायाचित्र

भारताने २००० किमीपर्यंत दूर असलेल्या शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता असलेल्या  अग्नि-२ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. अणवस्त्र नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची रात्री चाचणी घेण्यात आली. गेल्या वर्षीच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. पण पहिल्यांदाच ते रात्री लाँच करण्यात आले. या क्षेपणास्त्राची क्षमता ३००० किमीपर्यंत वाढवता येऊ शकते. रात्री एखाद्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. 

ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर याची चाचणी घेण्यात आली. भारतीय संरक्षण दलात हे क्षेपणास्त्र दाखल झाल्यानंतर सुरक्षेला एक नवा आयाम मिळेल असे बोलले जात आहे.

ब्रेकअप!, संसदेत आता विरोधी बाकावर बसणार शिवसेना

अग्नि-२ क्षेपणास्त्राची जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता आहे. त्याची लांबी २० मीटर आहे आणि १००० किलोग्रॅम पेलोड घेऊन जाण्याची याची क्षमता आहे. दोन स्टेजमध्ये आपले लक्ष्य साध्य करणारे हे मिसाइल सॉलिड फ्यूएलवर चालते. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने तयार केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Agni-2 ballistic missile with 2000 km strike range successfully tested at night in Balasore Odisha