पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभा निकालानंतर लालूंनी एकवेळचं जेवण सोडलं

लालूप्रसाद यादव

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे सुप्रिमो लालप्रसाद यादव यांनी अंशतः खाणे-पिणे सोडून दिले आहे. रांची येथील रिम्स रुग्णालयात दाखल असलेल्या लालूंवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी ही माहिती दिली. जेवण बंद केल्याने लालूंची प्रकृती ढासळत चालल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. उमेश प्रसाद म्हणाले की, सकाळचा नाश्ता ते कसेतरी करतात. पण दुपारचे जेवण त्यांनी बंद केले आहे. सकाळी नाश्ता आणि रात्रीचे जेवणच ते घेत आहेत. त्यामुळे त्यांना इन्सुलिन देण्यात अडचण येत आहे. तणावामुळे कदाचित असे होत असेल, असेही़ डॉ. प्रसाद यांनी सांगितले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत आरजेडीला एकही जागा मिळू शकलेली नाही. 

बिहारमध्ये लालूंच्या पक्षाची अवस्था बिकट, सगळेच उमेदवार हारले

डॉ. प्रसाद यांनी शनिवारी लालूप्रसाद यांना खूप समजावले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले तरीही त्यांनी ऐकले नाही. अशा परिस्थितीत जेवण आणि औषधे देणे आवश्यक आहे. जर वेळेवर जेवण केले नाहीतर औषधे देता येणार नाहीत. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शनिवारी लालूंचा रक्तदाब व शरीरातील साखर ठीक होती. पण अशीच स्थिती राहिली तर काही सांगता येणार नाही, असे डॉ प्रसाद यांनी सांगितले.

लालूपु्त्राच्या बॉडीगार्ड्सची दादागिरी, पत्रकाराला केली मारहाण

दरम्यान, शनिवारी आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष अभयसिंह, आमदार रामविलास यादव आणि लालूप्रसाद यादव यांचे आत्मचरित्र लिहिणारे नलिन वर्मा यांनी लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. भेटीनंतर अभयसिंह यांनी लालूप्रसाद हे ठीकपणे झोपू शकत नसल्याचे सांगितले होते. यावेळी लेखक नलिन वर्मा यांनी लालूंचे आत्मचरित्र ‘गोपालगंज टू रायसीना’ त्यांच्याकडे सोपवले.