पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेलंगणातील त्या घटनेमुळे आंध्रतील महिला अधिकाऱ्याने सुरक्षेसाठी केला हा उपाय

आंध्र प्रदेशमधील महिला अधिकारी उमा माहेश्वरी

तेलंगणामध्ये महसूल विभागातील एका महिला अधिकाऱ्याला त्यांच्या कार्यालयातच जिवंत जाळल्यानंतर काही महिला अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच प्रत्यय आंध्र प्रदेशमील कर्नुल जिल्ह्यात आला. कर्नूल जिल्ह्यातील एका सरकारी महिला अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयात खूर्चीपासून दूर एक दोर बांधला. अभ्यागत थेटपणे आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी हा उपाय योजण्यात आला. उमा माहेश्वरी असे या महिला सरकारी अधिकाऱ्याचे नाव आहे.

काँग्रेसचे बहुतांश आमदार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या बाजूने

काही जण मद्यपान करून थेट उमा माहेश्वरी यांच्या कार्यालयात घुसले होते. त्यांचे नेमके काय काम होते, हे स्पष्ट नव्हते. त्यांच्याकडे कोणतेही निवेदनही नव्हते. ते थेट कार्यालयात का आले होते, हे स्पष्ट नव्हते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या खुर्चीजवळ दोर बांधण्याचा निर्णय घेतला.

या संदर्भात एएनआयशी बोलताना उमा माहेश्वरी म्हणाल्या, तेलंगणामध्ये विजया यांच्या मृत्यूनंतर मी घाबरले होते. त्याचवेळी काल काही जण माझ्या कार्यालयात आले. त्यांनी मद्यपान केले होते. त्यांना बघितल्यावर मी जास्तच घाबरून गेले. त्यामुळेच मी माझी खुर्ची आणि अभ्यागत यांच्यामध्ये दोर बांधला. जेणे करून अभ्यागत आपल्या जास्त जवळ येऊ नयेत.

संजय राऊत म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांच्याशी भांडण नाही पण...

आपण केवळ भीतीपोटी तो दोर बांधला होता आणि ते लोक कार्यालयातून गेल्यावर एक तासाने मी तो रोप काढूनही टाकला, असेही उमा माहेश्वरी यांनी सांगितले.