पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेजस एक्स्प्रेसनंतर १५० रेल्वेगाड्या खासगी कंपन्यांकडे देण्याची सरकारची तयारी

तेजस एक्स्प्रेस

देशातील पहिल्यावहिल्या खासगी स्वरुपाच्या तेजस एक्स्प्रेसच्या शुभारंभानंतर आता केंद्र सरकारने आणखी काही रेल्वेगाड्या आणि रेल्वे स्थानके खासगी कंपन्यांच्या हातात सोपविण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. सरकारने देशातील तब्बल १५० रेल्वेगाड्या आणि ५० स्थानके यांची जबाबदारी खासगी कंपन्यांच्या हातात देण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्याशी या संदर्भात सल्लामसलत करण्यात आली आहे.

BLOG: मी आशावादी !

सुरुवातीच्या टप्प्यात १५० रेल्वेगाड्या खासगी कंपन्यांच्या हातात देण्यात येणार आहेत. यासाठी सचिव स्तरावरील एक उच्चाधिकार समितीही तयार करण्यात येईल. या समितीमध्ये नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, अर्थ खात्याचे सचिव, नगरविकास विभागाचे सचिव यांचा समावेश असणार आहे.

संघ स्वयंसेवकासह त्याची गरोदर पत्नी आणि लहान मुलाची निर्घृण हत्या

तेजस एक्स्प्रेस ४ ऑक्टोबरपासून नियमितपणे रेल्वेरुळांवरून धावण्यास सुरुवात झाली. लखनऊ ते दिल्ली हे अंतर ही रेल्वे सहा तास १५ मिनिटांत कापते. या मार्गावर फक्त कानपूर आणि गाझियाबाद या दोनच ठिकाणी ही रेल्वे थांबते. पूर्णपणे आयआरसीटीसीकडून चालविण्यात येणारी भारतीय रेल्वेची ही पहिलीच गाडी आहे.