पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांच्या पोटात वेदना, तपासणीसाठी रुग्णालयात आणले

पी चिदंबरम

चार आठवड्यांपासून तिहार कारागृहात कैदेत असलेले काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना पोटात वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर शनिवारी एम्स रुग्णालयात नेण्यात आले. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार त्यांना अजून रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्याचबरोबर त्यांनी न्यायालयाला वेळेआधी सुनावणी करण्याची विनंती केली होती. तपासणीनंतर चिदंबरम यांना पुन्हा कारागृहात आणण्यात आले.

इम्रान खान यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज नाही : भारत

न्या. एन व्ही रमणा, न्या. संजीव खन्ना आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या पीठासमोर वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाचा उल्लेख करत हा खटला त्वरीत सुचीबद्ध करण्याची विनंती केली. 

इस्रोतील शास्त्रज्ञाच्या हत्येचा उलगडा, अनैसर्गिक सेक्सनंतर तंत्रज्ञाने केला खून

चिदंबरम यांची याचिका सूचीबद्ध करण्यासंबंधीच्या निर्णयासाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवली जाईल, असे पीठाने म्हटले. चिदंबरम सध्या न्यायालयीन कोठडीत असून दिल्ली उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबरला त्यांची जामीन याचिका फेटाळली होती.