पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानने थार एक्स्प्रेस रोखली; भारताने दिले सडेतोड उत्तर

थार एक्स्प्रेस

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम - 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच संतापला आहे. पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेसनंतर आता थार एक्स्प्रेसची सेवा बंद केली आहे. ही एक्स्प्रेस राजस्थानच्या जोधपूर ते कराची दरम्यान चालते. यावर उत्तर देताना भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले की, 'हा पाकिस्तानचा एकतर्फी निर्णय आहे. भारताशी चर्चा न करता पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करा - नाना पटोले

पाकिस्तानकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर भारताने देखील सडेतोड उत्तर दिले आहे. रवीश कुमार यांनी पुढे असे सांगितले की, आम्ही पाकिस्तानला त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. आम्हाला वाटते की, पाकिस्तानकडून जे काही केले जात आहे ते द्विपक्षीय संबंधांचे चिंताजनक चित्र असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने सत्य स्विकार करण्याची हिच वेळ आहे. तसंच पाकिस्तानने इतर देशांच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करणे थांबवावे', असे त्यांनी सांगितले आहे.

दाभोलकर हत्या प्रकरण: सीबीआय समुद्रात शस्त्रास्त्र शोधणार

दरम्यान, पाकिस्तानने गुरुवारी समझौता एक्स्प्रेससी सेवा बंद केली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. त्यानंतर आता पाकिस्तानने थार एक्स्प्रेसची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मी रेल्वेमंत्री राहिल तोपर्यंत पाकिस्तान आणि भारतामध्ये एकही एक्स्प्रेस धावणार नाही, असे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री राशीद शेख यांनी सांगितले.