पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली ते लाहोर बससेवाही स्थगित

दिल्ली - लाहोर बससेवा स्थगित

दिल्ली वाहतूक महामंडळाने सोमवारी दिल्ली ते लाहोर बससेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून आधीच ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने नुकताच जम्मू-काश्मीर राज्याला दिलेला विशेष दर्जा रद्द केला. या संदर्भातील ३७० कलम रद्द करण्यात आले. त्याचबरोबर जम्मू-काश्मिरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारताशी असलेले व्यापारी संबंध तोडले आहेत. दोन्ही देशांमधील समझौता एक्स्प्रेसची सेवाही स्थगित करण्यात आली आहे.

लडाख सीमेवर पाकच्या हालचाली तीव्र, विमानं तैनात

गेल्या शनिवारी, पाकिस्तानमधील एका वरिष्ठ मंत्र्यांनी दोन्ही देशांमधील बससेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दिल्ली वाहतूक महामंडळाची बस सोमवारीच लाहोरच्या दिशेने निघणार होती. पण ही बस सोमवारी सोडण्यात आली नाही. बससेवा स्थगित करण्यात आली आहे.

दिल्ली वाहतूक महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानकडून बससेवा बंद करण्यात आल्यामुळे दिल्ली वाहतूक महामंडळही सोमवार, १२ ऑगस्टपासून लाहोरला बस पाठवू शकत नाही. पाकिस्तानमधील पर्यटन विकास महामंडळाने गेल्या शनिवारीच दिल्ली वाहतूक महामंडळाला फोनवरून बस वाहतूक बंद करीत असल्याचे सांगितले होते. 

आलमट्टीतून विसर्ग आणखी वाढविला...

गेल्या शनिवारी दिल्लीहून लाहोरसाठी शेवटची बस गेली. या बसमध्ये दोन प्रवासी होते. तर लाहोरहून आलेली बस त्याच दिवशी संध्याकाळी दिल्लीला पोहोचली. या बसमध्ये १९ प्रवासी होते.