पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता नटवरसिंहही म्हणाले, नेहरुंना सरदार पटेल पहिल्या कॅबिनेटमध्ये नको होते

माजी केंद्रीय मंत्री नटवरसिंह

सरदार वल्लभभाई पटेल १९४७ मध्ये जवाहरलाल नेहरु यांच्या पहिल्या कॅबिनेट यादीत समावेश होता का ? या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री के नटवरसिंह यांनीही सहमती दर्शवली आहे. नुकताच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नारायणी बसूद्वारा लिखित त्यांचे आजोबा व्ही पी मेनन यांच्या आत्मचरित्राचा हवाला देत जवाहरलाल नेहरु यांना आपल्या कॅबिनेटमध्ये सरदार वल्लभभाई पटेल नको होते, असा दावा केला होता.

नटवरसिंह यांचे 'संडे गार्डियन' वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हटले की, जवाहरलाल नेहरु यांनी मंत्रिमंडळात समावेश न करणाऱ्या लोकांची यादी केली होती. त्यात सरदार पटेल यांच्या नावाचा समावेश होता. मी पहिल्यांदा १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या एच व्ही होडसन यांचे पुस्तक 'द ग्रेट डिव्हाईड' मध्ये याबाबत वाचले होते. होडसन यांनी लिहिले होते की, पंडित नेहरु यांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्या कॅबिनेट यादीत सरदार पटेल यांचे नाव नव्हते. (एका तळटीपमध्ये ते लिहितात, संभवतः हे गांधीजींच्या सल्ल्याने झाले आहे) या लेखाबरोबरच नेहरुंच्या त्या पत्राच्या प्रतीही आहेत, ज्यामध्ये त्यांनी मंत्र्यांच्या नावाची यादी दिली होती. 

लष्करात महिलांना पर्मनंट कमिशन द्या,सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

पटेल यांचा मंत्रिमंडळात समावेश नसल्याचे समजल्यानंतर व्ही पी मेनन यांनी व्हॉइसरायकडे जाऊन त्यांना इशारा दिला होता. काँग्रेसमध्ये उत्तराधिकाराची लढाई सुरु होईल आणि त्यामुळे देशाचे विभाजन होईल, असे त्यांनी म्हटले होते. परंतु, पटेल हे पक्षाचे कोषाध्यक्ष आणि समितीचे अध्यक्ष होते. ते संसदीय उमेदवारांची निवड करत असत.

... अखेर एअरटेलने १०००० कोटी सरकारकडे जमा केले

जयशंकर यांनी मेनन यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करताना म्हटले होते की, पुस्तकावरुन समजते की नेहरुंना १९४७ मध्ये आपल्या मंत्रिमंडळात पटेल नको होते. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीतून बाहेर ठेवण्यात आले होते. यावरुन मोठा वादही निर्माण झाला होता. प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी जयंशकर यांच्यावर टीका केली होती आणि हे काम आयटी सेल वाल्यांसाठी ठेवा, असा टोलाही लगावला होता.

महिलेच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला मुंबईत अटक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:After S Jaishankar now Natwar Singh said Yes Jawaharlal Nehru did not want to keep Sardar Patel in the cabinet