पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्यावर निर्णय देणाऱ्या सरन्यायाधीश गोगोईंना झेड प्लस सुरक्षा

सरन्यायाधीश  रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त होणारे रंजन गोगोई यांना आसामध्ये झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. मागील आठवड्यात अयोध्या प्रकरणाचा निकाल देण्यापूर्वी रंजन गोगोई यांच्यासह इतर चार न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आसाम पोलिसांना गोगोई यांच्या दिब्रूगड येथील त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी आणि गुवाहाटी येथील दुसऱ्या निवासस्थानी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नाहीः संजय राऊत

केंद्रीय गृहमंत्रालयाने गोगोई यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यास सांगितल्याचे आसाम पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले आहे. गोगोई हे निवृत्तीनंतर गुवाहाटी येथे राहणार असल्यामुळे आम्ही सुरक्षेची तयारी केली आहे.

गुवाहाटी येथील गोगोई यांचे जुन्या निवासस्थानाचे नूतनीकरण केले जात आहे. मागील वर्षी गोगोई यांच्या गुवाहाटी येथील कामाख्या मंदिर शक्तीपीठ दौऱ्या दरम्यान सुरक्षेत निष्काळजी केल्यामुळे उपायुक्त भवंर लाल मीना यांना निलबिंत करण्यात आले होते. दि. ९ नोव्हेंबर रोजी रंजन गोगोई आणि इतर चार न्यायाधीशांच्या घटनापीठाने अयोध्या वादावर निर्णय दिला होता.

मतभेदांमुळे रजत शर्मांनी DDCAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला