पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयांनंतर नरेंद्र मोदी म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवस लॉकडाऊन जाहीर केले आहे. यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सकाळी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. या सर्व निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दरात पाऊण टक्क्याने कपात केली. गेल्या दशकातील ही सर्वात मोठी कपात आहे. त्याचवेळी सर्व प्रकारच्या कर्जांवरील हफ्ते तीन महिने स्थगित करण्याचा निर्णयही बँकेने घेतला आहे. 

...म्हणून चंद्रकांत पाटील यांनी सुरक्षा केली परत

या सर्व निर्णयानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून रिझर्व्ह बँकेचे कौतुक केले. नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आपली अर्थव्यवस्था सुरक्षित राहावी यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे बाजारातील रोकडतेते आणखी वाढ होईल. याचा मध्यमवर्गीयांना आणि उद्योगपतींना मोठा फायदा होईल.

कोरोनाविरोधातील लढाईसाठी साई संस्थानकडून ५१ कोटींची मदत

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी रेपो दरात पाऊण टक्का कपात केली. यामुळे रेपो दर ४.४ टक्क्यांवर आला आहे. हा गेल्या १५ वर्षांतील सर्वात कमी रेपो दर आहे. रिव्हर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांनी कपात केली आहे. सर्व प्रकारच्या कर्जांचे हफ्ते पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आले आहे. यामध्ये गृह आणि व्यावसायिक कर्जांचाही समावेश आहे.