पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

LOC वरील तणाव कमी करण्यासंदर्भात पाकचा भारताकडे प्रस्ताव

गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवरील तणावपूर्ण वातावरण आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात निंयत्रण रेषेवर (एलओसी) तणावपूर्ण वातावरण आहे. हा तणाव कमी करुन सीमारेषेवर शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने भारताला प्रस्ताव पाठवल्याचे वृत्त आहे. भारताकडून वाढत्या दबावामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.  

दरम्यान दोन्ही राष्ट्रांमधील चर्चेसाठी तयार करण्यात आलेल्या संस्थात्मक लष्करी माध्यमातून पाकिस्तानने भारताकडे प्रस्ताव पाठवला आहे. आम्ही सीमारेषेवरील तणावपूर्ण वातावरण नियंत्रित करण्यासाठी तयार आहोत, असा उल्लेख त्यांनी प्रस्तावात केला आहे, अशी माहिती भारतीय संरक्षण विभागाशी संलग्नित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 

पाककडून भारतीय हद्दीत घुसलेले विमान जबरदस्तीने जयपूरमध्ये उतरवले, IAF ची कामगिरी

संस्थात्मक लष्करी उपक्रमाच्या माध्यमातून दोन्ही देशांतील  अधिकारी नियमित एकमेकांच्या संपर्कात आहेत. याच चर्चेतून सीमारेषेवरील तणावपूर्ण वातावर नियंत्रित करण्यासंदर्भात प्रस्तावाची बोलणी सुरु आहे. प्रस्तावात सीमारेषेवर तैनात असलेली स्पेशल सर्विस ग्रुप (एसएसजी) तुकडीला माघारी बोलवण्याची तयारी पाकिस्तानने दर्शवली आहे. दोन्ही बाजूने होणाऱ्या गोळीबाराच्या घटना नियंत्रित करण्यासंदर्भातील उपाय म्हणून काही सूचनांचा देखील प्रस्तावात समावेश आहे.  या प्रस्तावाची एक प्रत पंतप्रधान कार्याला पाठविण्यात आली असून याची हिंदूस्तान टाइम्सने खात्री केली आहे. 

हिंदी महासागरात भारत-फ्रान्स नौसेनेचा युद्ध सराव

जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे फेब्रुवारीमध्ये लष्करी जवानांच्या गाडीवर जैशे मोहम्मदच्या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. याचे प्रत्युत्तर म्हणून भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये घुसून दहशतवादी तळे उध्वस्त केली होती. या घटनेनंतर पाकिस्तानने भारताला लागून असलेल्या सीमारेषेवर विशेष तुकडी तैनात केली होती.