पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राम मंदिर झाले; लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा झाल्यास राजकारण सोडतो'

गिरिराज सिंह

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी वादात अडकणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी आता राजकारणापासून दूर जाण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आपले काम पूर्ण झाले आहे. आता फक्त लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणापासून दूर होईन, असे गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे. 

भाजपची मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे गिरिराज सिंह यांनी राजकीय निवृत्तीबाबत आपले मत व्यक्त केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शनिवारी ते म्हणाले की, अयोध्येत राम मंदिराची स्थापना करण्याचे माझे काम पूर्ण झाले आहे. माझ्यासारख्या लोकांची आता राजकीय सन्यास घेण्याची वेळ आली आहे. विशेषतः लोकसंख्या नियंत्रण कायदा झाल्यास मी स्वतःहून राजकारणापासून वेगळा होईन.

ब्रेकअप!, संसदेत आता विरोधी बाकावर बसणार शिवसेना

गिरिराज सिंह हे बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून लोकसभेवर गेले आहेत. त्यांच्याविरोधात विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार उभा होता. गिरिराज सिंह हे केंद्र सरकारमध्ये पशुपालन, डेअरी आणि मत्स्य पालन मंत्री आहेत.