पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मिशन चांद्रयान-२ नंतर भारताची नजर आता शु्क्र आणि सूर्याकडे

चांद्रयान २ (एएनआय)

१५ जुलैला अवकाशात झेपावणाऱ्या मिशन चांद्रयान-२ बरोबरच भारताची नजर आता शुक्र आणि सूर्याकडे आहे. मिशन चांद्रयान-२ च्या तयारीबाबत केंद्र सरकार आणि इस्रोकडून संयुक्त माहिती देण्यात आली. भारताच्या महत्वकांक्षी अंतराळ प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली. गेल्या काही काळापासून भारताने अंतराळ क्षेत्रात मोठे यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनीही भारताच्या अंतराळ विज्ञानाने सूर्य, शुक्रासारख्या ग्रहांपर्यंत जाण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचे म्हटले. 

भारत स्वतःचं अंतराळ स्थानक उभारणारः इस्रो प्रमुख

चांद्रयान-२ बाबत सिवन म्हणाले की, इस्रोची नजर आता सूर्याकडे आहे. यासाठी एक मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सूर्याच्या लिबरेशन पाँईट १ वर एक उपग्रह पाठवण्याची योजना आहे. 

प्रतीक्षा संपली, १५ जुलैला चांद्रयान-२ झेपावणार

मिशन गगनयान डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण होईल. या मोहिमेत इस्रो पहिल्यांदाच भारतात बनवलेले रॉकेट पाठवेल. याचे प्राथमिक प्रशिक्षण भारतात देण्यात येईल. पण यातील अद्यावत प्रशिक्षण हे परदेशात होईल. या मोहिमेचे अंदाजपत्रक १० हजार कोटी पर्यंत आहे. भविष्यात आमचे मिशन व्हिनस (शुक्र) २०२३ ही मोहीम असेल, असेही सिवन यांनी सांगितले.