बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव सध्या मूत्रपिंडाच्या (किडनी) विकाराने त्रस्त आहेत. त्यांची किडनी केवळ ३७ टक्केच काम करत आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरल्याने ते सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर रांचीतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रांना सोडायंचंय PMO
राजेंद्र इन्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (रिम्स) लालूप्रसाद यांच्यावर उपचार सुरु असल्याचे डॉ. पी के झा यांनी सांगितले. लालूप्रसाद यादव यांची किडनी केवळ ३७ टक्के काम करत आहे. त्यांच्या किडनीचे ६७ टक्के इतके नुकसान झाले आहे. मागील एक आठवड्यापासून त्यांची प्रकृती अस्थिर आहे. त्यांच्या रक्तात दोष उत्पन्न झाला आहे. त्यांना एक फोड आले होते. त्याच्यावरील उपचारावेळी याची माहिती झाली. किडनीची कार्यक्षमता ५० टक्क्यांवरुन ३७ टक्केपर्यंत कमी झाली आहे.
VIDEO: मोदींचे नाव घेताच पाकिस्तानच्या मंत्र्याला बसला शॉक
लालूप्रसाद मधुमेह, रक्तदाब आणि किडनीशिवाय इतर आजाराने ग्रस्त आहेत. चारा घोटाळ्यातील चार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर ते १४ वर्षांची शिक्षा भोगत आहेत. ते गेल्या एक वर्षांपासून रिम्समध्ये उपचार घेत आहेत.