पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आसाम NRC: अंतर्गत मुद्यावरुन इम्रान खान यांची पुन्हा घुसखोरी!

पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भारताच्या अंतर्गत मुद्यामध्ये नाक खूपसण्याची खोड जाता जाईना, असेच चित्र आहे. काश्मीरमधील कलम ३७० नंतर गरळ ओकल्यानंतर इम्रान खान यांनी आता आसाममधील नागरिकत्व नोंदणीच्या प्रक्रियेवर भारतावर आगपाखड सुरु केली आहे. 

आसाममधील नागरिक नोंदणीची अंतिम यादी जाहीर, १९ लाख लोक बाहेर

आसाममधील नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)ची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर इम्रान खान यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एनआरसी हा मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या कटाचा एक भाग असल्याचे टि्वट इम्रान खान यांनी केले आहे. भारतीय प्रसारमाध्यमांतील वृत्ताचा दाखला देत इम्रान यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. 
मोदी सरकार भारतातील मुस्लीम बांधवांना लक्ष्य करत असून त्यांच्या या कटू नितीची जगभराने दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मोदी सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय आणि आसाममधील नागरिकत्व नोंदणी प्रकारातून भारत सरकार मुस्लिम समाजाला लक्ष्य करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी एनआरसीची अंतिम यादी आपल्या टि्वटमध्ये टॅग केली आहे.  

यापूर्वी काश्मीरच्या मुद्यावरुन त्यांनी केलेल्या विधानाचा भारतने निषेध नोंदवला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत पाकिस्तानची विधाने निर्थक असल्याचे म्हटले होते. आसामच्या मुद्यावर भारत इम्रान खान यांना काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:After kashmir wider policy now imran khan tweet About assam nrc illegal annexation of to target muslims dmp