पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कमलनाथ यांचे सरकार पडले तर आम्हाला जबाबदार धरू नका'

मुख्यमंत्री कमलनाथ

जर मध्य प्रदेशमधील सरकारही पडले, तर त्यासाठी भाजपला जबाबदार धरले जाऊ नये, असे सूचक वक्तव्य मध्य प्रदेशमधील भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे. दोनच दिवसांपूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता राजकीय वर्तुळाचे लक्ष मध्य प्रदेशमधील घडामोडींकडे लागले आहे.

BJP च्या दोन आमदारांचे कमलनाथ सरकारच्या बाजूनं मतदान

शिवराजसिंह चौहान म्हणाले, काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत मतभेद आहेत. जर त्यामुळे काही घडले, तर त्यासाठी आम्हाला जबाबदार धरले जाऊ नये. राज्यातील सरकार पडण्यासाठी आम्ही अजिबात जबाबदार नाही. 

मध्य प्रदेश विधानसभेत गुन्हे विषयक (संशोधन) विधेयकावर झालेल्या मतदानावेळी भाजपच्या दोन आमदारांनी कमलनाथ सरकारच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी हे वक्तव्य केले आहे. या दोनपैकी एका सदस्याने या मतदानानंतर आपली भूमिका म्हणजे घरवापसी असल्याचे म्हटले आहे. भाजपचे हे दोन्ही आमदार पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते होते. या घडामोडींनंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपले सरकार बहुमतात आहे, हेच यातून दिसून आल्याचे म्हटले आहे.

केंद्रात मोठे प्रशासकीय फेरबदल, भल्ला गृह विभागात ओएसडी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी या दोन्ही आमदारांच्या कृतीचे कौतुक केले. आमचे सरकार अल्पमतात आहे, असे म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांना दोन्ही आमदारांनी त्यांची जागा दाखवून दिली, असे शिंदे यांनी म्हटले आहे.