पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लखनऊमध्येही विद्यार्थ्यांची संतप्त निदर्शने, किरकोळ दगडफेक

महाविद्यालयाचे प्रवेशद्वार बाहेरून बंद करण्यात आले. (एएनआय)

दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठ आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठानंतर सोमवारी नागरिकत्व कायद्यातील बदलांविरोधात उत्तर प्रदेशात लखनऊमध्ये नादवा महाविद्यालयात संतप्त निदर्शने करण्यात आली.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

नादवा महाविद्यालयातील काही विद्यार्थी रविवारी रात्री बाहेर आले आणि त्यांनी जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अटक करण्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक तिथे दाखल झाले. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विद्यापीठाच्या आवारात नेण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा विद्यार्थी आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी विद्यापीठाचे प्रवेशद्वार बाहेरून बंद केले. यावर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही जणांनी किरकोळ दगडफेकही केली. सुमारे १५० विद्यार्थी घोषणा देत विद्यापीठाच्या आवाराबाहेर आले होते. 

नादवा महाविद्यालयातील परिस्थिती आता नियंत्रणात आली असून, विद्यार्थी पुन्हा एकदा त्यांच्या वर्गात गेले आहेत, असे लखनऊचे पोलिस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी सांगितले.

पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक, 'उद्धव ठाकरे होश मैं आओ'च्या घोषणा

अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्येही रविवारी जोरदार निदर्शने झाली. तिथे पोलिस आणि विद्यार्थी यांच्यात झालेल्या चकमकीत ६० विद्यार्थी जखमी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलिगढ विद्यापीठ प्रशासनाने ५ जानेवारीपर्यंत सुटी जाहीर केली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तातडीने आपले वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.