पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'देश के गद्दारों को...' यासारख्या विधानांनी घात केला- अमित शहा

अमित शहा

दिल्ली विधानसभेतील पक्षाच्या पराभवावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य केले आहे. 'देश के गद्दारों को' यासारखी भाषा प्रचारादरम्यान वापरायला नको होती. प्रचाराच्या दरम्यान नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे पक्षाला नुकसान झाले, असे शहांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही जय-पराजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत नाही. भाजप विचारधारा आणि विस्तार यावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे, असेही ते यावेळी म्हणाले.  

नेहरु-पटेल कॅबिनेटवरुन परराष्ट्र मंत्री जयशंकर-रामचंद्र गुहा आमनेसामने

अमित शहा म्हणाले की, राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यापासून मी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत सहभागी होता. दिल्ली निवडणुकीत पहिल्यांदा निकाल आमच्या विरोधात लागलेत असे नाही. यापूर्वीही आम्ही पराभव पाहिला आहे. तेव्हाही आम्ही चांगला प्रयत्न केला होता. मी भाजपचा एक कार्यकर्ता असून पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले. 

मनीषा म्हैसकर यांच्यासह राज्यातील या IAS अधिकाऱ्यांच्या

यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात देखील विरोधकांना टोला लगावला.  ज्यांना सीएएच्या मुद्यावर माझ्याशी चर्चा करायची आहे ते माझ्या कार्यालयात येऊन वेळ घेऊ शकतात. त्यांना तीन दिवसांच्या आत त्यांच्याठी उपलब्ध असेन, असेही ते म्हणाले.  ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक निर्णय पंतप्रधान मोंदीच्या निर्णयामुळे मार्गी लागले. लोकशाहीत शांतीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण आंदोलनात बस जाळण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही त्यांनी बजावले.  

ट्रम्प यांना झोपड्या दिसू नयेत म्हणून भिंत बांधण्याची लगबग 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी  भाजपच्या काही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. काही नेत्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल दहशतवादी असल्याचेही संबोधले. भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे राजकारण खालच्या स्तरावर गेल्याची चर्चाही रंगली होती. त्यानंतर आता शहा यांनी चिथावणीखोर भाषा वापरायला नको होती, असे म्हणत भाजपच्या नेत्यांना सुनावले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:after delhi election result amit shah says BJP may have suffered because of hate statements made by party leaders