कोरोना विषाणूचा प्रकोप थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लावून लोकांना घरातच राहण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु, देशातील वेगवेगळ्या भागात स्थलांतरित मजूर एकत्र आल्याची छायाचित्रे चिंता वाढवणारी ठरत आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये मंगळवारी सुमारे २४०० मजुरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
व्हाइट हाऊसनं पंतप्रधान मोदींना केलं अनफॉलो
हैदराबाद आयआयटी येथे बांधकामाच्या साईटवर काम करणारे सुमारे २४०० मजूर बुधवारी रस्त्यावर उतरले. या मजूरांना आपल्या घरी जायचे आहे. त्याच्या मागणीसाठीच ते रस्त्यावर उतरल्याचे संगारेड्डी ग्रामीण पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिस त्यांची समजूत घालत आहेत. याचदरम्यान काही संतप्त मजुरांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. नाराज मजुरांनी परिसरात तैनात पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली.
Around 2,400 migrant labourers who were working at construction sites in IIT Hyderabad staged protest today morning, demanding they be sent back to their homes: Sangareddy Rural Police. #Telangana pic.twitter.com/xvhGaIcFb2
— ANI (@ANI) April 29, 2020
या दगडफेकीत एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. संगारेड्डी पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार या मजुरांनी पोलिसांच्या एका वाहनाचेही नुकसान केले आहे. यापूर्वी मुंबईतील वांद्रे येथेही कामगार मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. या मजुरांनीही घरी जाण्याची मागणी केली होती.