पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या निकालानंतर लगेचच Uniform Civil Code हॅशटॅग ट्रेंडमध्ये

शरयू किनारी वसलेल्या अयोध्येमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. (फोटो - दीपक गुप्ता)

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त २.७७ जागा रामलल्ला विराजमान पक्षकारांना म्हणजे हिंदू पक्षकारांना देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या एकूण जागेपैकी पाच एकर जागा मुस्लिम पक्षकारांना देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. 

बाळासाहेब असायला हवे होतेः राज ठाकरे

या निकालानंतर सोशल मीडिया साईटवर अनेक नेटिझन्स संयत लिखाणाच्या पोस्ट प्रसिद्ध करीत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्याचबरोबर समाजातील सौहार्दपूर्ण वातावरण कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असेही नेटिझन्स म्हणत आहेत. पण न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता Uniform Civil Code हा हॅशटॅग ट्विटरवर भारतात ट्रेंड होतो आहे. काही नेटिझन्सनी आता समान नागरी कायद्याचा प्रश्नही केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारने मार्गी लावावा, असे आवाहन केले आहे.

देशात ट्रेंड होणारे हॅशटॅग

नेटिझन्सनी आपल्या ट्विटमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आले, तिहेरी तलाक हटविण्यात आला, आता अयोध्येतील राम मंदिराचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे सरकारने आता समान नागरी कायद्याचा विषय प्राधान्याने उचलावा, असे म्हटले आहे.