पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Doctors Strike : डॉक्टरांनी नाकारली ममतांची ऑफर

डॉक्टरांचा संप सुरुच

कोलकाता येथील नील रतन या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर पुकारण्यात आलेला संप मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठेवलेला चर्चेचा प्रस्ताव नाकारला असून संप सुरुच राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. 

पश्चिम बंगालमधून सुरु झालेल्या संपाचे लोण आता देशभर पसरत असून केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. त्यांनी सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात विशेष लक्ष घालण्याबाबत सूचना केल्या आहेत. कोलकातामध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी शुक्रवारपासून एम्स आणि सफरदरजंग येथील डॉक्टरांनी पश्चिम बंगालमधील ममता सरकारला ४८ तासांची मुदत दिली आहे. डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप पुकारणार असल्याची भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, टीएमसीच्या ३ कार्यकर्त्यांची हत्या

डॉक्टरांना रूग्णालयांमध्ये सुरक्षित वातावरण असावे, पश्चिम बंगालमध्ये ज्युनिअर डॉक्टरवर डॉक्टरवर हल्ला केला गेला त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या संपात उतरलेल्या डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये सुरु झालेल्या डॉक्टरांच्या संपाला देशातील १९ पेक्षा अधिक राज्यातून समर्थन देण्यात आले आहे. दिल्लीतील एम्ससह १८ पेक्षाअधिक रुग्णालयातील जवळपास १० हजार डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारी देशभरातील डॉक्टरांना राष्ट्रव्यापी आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:after assault on junior doctors in west bengal doctors strike continues doctors reject Mamata Banerjee