पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नरसंहार, ५ मजुरांची केली हत्या

संग्रहित छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे मंगळवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी पाच बाहेरील राज्यातील मजुरांची हत्या केली तर एकाला जखमी केले आहे. कुलगाममधील काटरोसू परिसरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बाहेरील मजुरांच्या एका समूहावर गोळ्या झाडल्या यामध्ये सहा जणांना गोळ्या लागल्या. त्यांना त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी पाच मजुरांना मृत घोषित केले. 

तिढा सुटणार? सेनेशी मिळतंजुळतं घेण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

बंदुकधारी लोक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी एक मोहीम सुरु करण्यात आली आहे. सर्व मजूर हे पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगण्यात येते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी टि्वट करुन मुर्शिदाबाद येथील पाच मजुरांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या नृशंस हत्येमुळे आम्ही खूप दुःखी आणि स्तब्ध  आहे. आमच्या शब्दांमुळे मृतांच्या नातेवाईकांचे दुःख कमी करु शकत नाही. या क्षणी आम्ही पीडित कुटुंबीयांची सर्वतोपरी मदत करु, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी

दरम्यान, मागील २४ तासांतील हा दुसरा आणि मागील १५ दिवसांतील सहावा हल्ला आहे. यूरोपीयन संसदीय मंडळाचे शिष्टमंडळ हे काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:after article 370 abrogation big terrorist attack in Kashmir 5 non kashmiri workers were killed