पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्येत आदित्यनाथ यांच्या हस्ते रामलल्लांची मूर्ती फायबर मंदिरात हलविली

योगी आदित्यनाथ रामलल्लांची मूर्ती घेऊन जाताना.(फोटो - एएनआय)

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी पहाटे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अयोध्येत रामलल्लांची मूर्ती सध्याच्या मंदिरातून नव्याने तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या फायबर मंदिरात हलविण्यात आली. मंदिर परिसरातच नवे फायबर मंदिर तयार करण्यात आले आहे. मंदिर परिसरात लवकरच राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. त्यासाठी नवे मंदिर तात्पुरत्या स्वरुपात निर्माण करण्यात आले आहे.

सांगलीत एकाच कुटुंबातील ५ जण कोरोनाग्रस्त, राज्याचा आकडा ११२ वर

उत्तर प्रदेशात आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होते आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बुधवारी पहाटे साडेचार वाजता योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. २७ वर्षांनी रामलल्लांची मूर्ती या ठिकाणाहून हलविण्यात आली आहे. ६ डिसेंबर १९९२ मध्ये ही मूर्ती या ठिकाणी आणण्यात आली होती. यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते. अनेक साधू-महंतही यावेळी मंदिर परिसरात उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिलेल्या निकालानुसार ही जागा रामलल्ला विराजमान यांना देण्याचा निकाल दिला. या ठिकाणी मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्याप्रमाणे केंद्र सरकारने ट्रस्टची स्थापन केली आहे. 

...तर दिसताक्षणीच गोळ्या घालू, 'या' मुख्यमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

रामलल्लांची मूर्ती हलविण्यापूर्वी सोमवारपासून या ठिकाणी वैदिक मंत्रोच्चाराला सुरुवात झाली होती. मंगळवारी रात्रीपर्यंत हे पठण सुरू होते.