पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाक रेंजर्सच्या मदतीने दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात

भारतीय लष्कराला सतर्कतेचा इशारा

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा डाव आखत असल्याची माहिती मिळत आहे. यापार्श्वभूमीवर सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. काश्मीर, पंजाब, राजस्थानला लागून असलेल्या सीमेवरील जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान नियंत्रण रेषेवरील हालचालीवर डोळ्यात तेल घालून पाहरा देत आहेत.  

मनसे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे सूचक ट्विट

पाकिस्तानी, अफगाणी आणि तालिबानी दहशतवादी भारतात घुसखोरी करणार असल्याची माहिती गुप्तचर संस्थांच्या अहवालातून समोर आली आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तान रेंजर्स मदत करणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. यासंदर्भात सुरक्षा संस्थांनी काही कॉलही टॅप केले असून दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यासाठी सीमारेषेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.पाकिस्तान ड्रोनच्या माध्यमातून दहशतवाद्यांना शस्त्र पुरवणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे म्होरक्या पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या मदतीने हा डाव आखत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे इंटीग्रेटेड चेक पोस्ट, अटारी बॉर्डर, हुसेनीवाला बॉर्डर आणि करतारपुर कॉरिडोरवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

मायावतींनी HM अमित शहांचे चॅलेंज स्वीकारलं

जम्मू काश्मीरमधील १३ पाण्याचे झरे ३ मोठ्या नद्यांच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पंजाबमधील नदीपरिसरातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील सीमारेषेवरील कडेकोट बंदोबस्तामुळे दहशतवादी इतर सीमारेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील, असा अंदाज गुप्तचर संस्थांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सीमारेषवरही जवान सतर्क झाले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याचे पाहायला मिळाले होते. भारताच्या अंतर्गत गोष्टीत हस्तक्षेप करण्याचे पाकिस्तानचे सर्व प्रयत्न फसले आहेत. जम्मू काश्मीरच्या सीमारेषेवरील लष्कराच्या बंदोबस्तामुळे दहशतवादी अन्य सीमारेषेवरुन देशात घुसण्याचा डाव रचत असल्याचे दिसते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Afghanistan terrorists trying to infiltrate before Republic Day by help of Pakistan Rangers