पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात विद्यार्थ्यांपेक्षा गायी सुरक्षित; ट्विंटकल खन्नाची खोचक टिप्पणी

ट्विंकल खन्ना

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) घुसून रविवारी रात्री तोंडाला रुमाल बांधून आलेल्या काही अज्ञातांनी हाणामारी आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. तब्बल चार तास हे अज्ञात हल्लेखोर विद्यापीठात हिंसाचार करत होते. विद्यापीठातील साबरमती वस्तीगृह, साबरमती टी-पाईंटसह अनेक वस्तीगृहात घुसून हल्लेखोरांनी तोडफोड केली. या हल्ल्याचा बॉलिवूड कलाकारांनी तीव्र निषेध केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केला. तसंच, जेएनयू प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

जेएनयू हिंसाचारः मुंबईत मध्यरात्रीपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन

ट्विंकल खन्नाने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'भारतात गायींना विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सुरक्षा मिळाली आहे. हा तो देश आहे ज्याने भीतीने जगण्यास नकार दिला आहे. तुम्ही हिंसाचार करून लोकांना दडपू शकत नाही. याचा सर्वात जास्त निषेध केला जाईल. नागरिक रस्त्यावर उतरतील.'

JNU कँम्पसमध्ये हाणामारी, विद्यार्थी अध्यक्षा आयशी घोष गंभीर जखमी

दरम्यान, ट्विंकल खन्नाच्या आधी बॉलिवूडमधील अभिनेत्री स्वरा भास्कर, सोनम कपूर, शबाना आझमी, अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मा, ऋचा चड्डा, तापसी पन्नू, जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांनी या घटनेचा निषेध करत ट्विट केले आहे. तसंच, दिल्ली पोलिसांनी दोषींविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. 

पाकमध्ये शीख युवकाची हत्या, भारताकडून संतप्त प्रतिक्रिया

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:actress twinkle khanna says india where cows seem to receive more protection than students